डॉ. मधुचंद्र भुसारे व डॉ. अक्षय घोरपडे यांनी भाषा अनुवादित माईक प्रणाली शोधल्याबद्दल भारत सरकारतर्फे मिळाले पेटंट

45

 

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे तसेच जामनेर येथील जा. ता. ए. सो. गी.द. म.कला, के. रा. न. वाणिज्य व म.धा. विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अक्षय किशोर घोरपडे या दोन प्राध्यापकांनी ‘भाषा अनुवादित माईक प्रणालीचा’ शोध लावला त्याबद्दल त्यांना भारत सरकार पेटंट कार्यालयातर्फे पेटंट नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महाविद्यालयांमध्ये हे प्राध्यापक कार्यरत असून ते मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. हे शोधलेले माईक राजकारणी,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांसाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. जगातील सर्व भाषा शिकणे सोपे नाही म्हणून अनुवादक ज्या भाषेत बोलेल त्या भाषेचे बोलल्या गेलेल्या भाषेतच रूपांतर करू शकतो किंवा होईल. त्यामुळे कोणत्याही भाषेत संगणकावर, मोबाईलवर
माइकमध्ये बोलले जाऊ शकता येईल आणि आउटपुट मध्ये जी भाषा असेल तसेच
प्रेक्षकांना ज्या भाषेतून संबोधित करायचे असेल ती बोललेली भाषा अनुवादित व रूपांतरित होईल त्यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधणे व कोणत्याही भाषा बोलणाऱ्या लोकांसमोर भाषण करणे सोपे होईल.जिथे तंत्रज्ञान अजून वापरले जात नाही त्या भागात याचा वापर सहज शक्य होईल.
डॉ.मधुचंद्र भुसारे व डॉ. अक्षय घोरपडे यांनी केलेल्या व भारत सरकारतर्फे मिळविलेल्या पेटंट संशोधनाचा सर्व सामान्य लोकांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यांनी मिळवलेल्या या भाषा विषयात मिळालेल्या पेटंटबद्दल सर्व स्तरातून व परिसरातून कौतुक होत आहे.