

अमरावती ( वार्ताहर )
उपेक्षित समाज महासंघ व वऱ्हाड विकास अमरावतीच्या वतीने जिल्हा खुले कारागृह मोर्शी,जि.अमरावतीच्या सांस्कृतिक सभागृहात दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी २१ व्या राज्यस्तरीय म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.महात्मा फुलेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ. आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना हारार्पण करून अभिवादन करण्यात येईल.
प्रथम सत्रात 28 नोव्हेंबर रोजी स.९ वा.मोर्शी खुले कारागृहात भव्य ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ होणार आहे.ग्रंथदिंडीत महात्मा फुलेंचे समग्र वाड्.मय,भारताच्या संविधानासह इतरही पुरोगामी ग्रंथ असतील.खुले कारागृहातील वैराग्यमूर्ती गाडगेबाबांच्या मूर्तीला अभिवादन करून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होईल.बंदीजन भजन मंडळींचा सहभाग राहील.
दुसऱ्या सत्रात स.१० वा.समतेची मशाल प्रज्वलित करून महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल.याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकतेचे वाचन तसेच मा.उत्तमराव भैसने संत गाडगेबाबा वंदनगीत गायन तर प्रा.अरुण बुंदेले स्वरचित क्रांतिकारी स्वागतगीत व म. फुलेंचे अखंड गायन करतील. फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व पुरोगामी विचारवंत प्राचार्य श्री सुधीर महाजन (पोदार इंटरनॅशनल स्कूल) हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर प्राचार्य श्री रामराव वानखडे हे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे संस्थापक संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे भूमिका विशद करतील.याप्रसंगी मार्गदर्शक खुले कारागृहाचे अधिक्षक श्री.डी.एन.खरात, प्रमुख अतिथी माजी कारागृह अधिक्षक श्री.कमलाकर धोंगडे, नाट्यकर्मी प्रा.पी.जी.भामोदे, प्रा.डॉ.बी.एस.चंदनकर,श्री. केशवराव कांडलकर,श्री. अजयराव पाटील,श्री कृष्णदास माहोरे,श्री.महेंद्रजी भातकुले, युवा पत्रकार श्री नयन किसनराव मोंढे राहणार आहेत.
तिसऱ्या सत्रात दोन परिसंवादात डॉ. रजिया सुल्ताना या ,’महात्मा फुलेंचे सत्यशोधकीय विचार: बंदीजन आणि परिवर्तनाच्या दिशा’ या विषयावर तर प्रा.डॉ.सुशील अशोकराव धाबे हे ‘महात्मा फुलेंच्या सामाजिक क्रांती मागील प्रेरणा व आजची अनिवार्यता’ या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडतील. सुप्रसिद्ध नाट्यकलावंत अभिनेत्री सौ.अपूर्वा सोनार (सावित्री शक्तीपीठ,पुणे) या ‘मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग सादर करतील.डॉ.प्रतिभा ज्ञानेश्वर घाटोळ,डॉ. कल्याणी भास्करराव कावलकर ह्या सूत्रसंचालन करतील.
चौथ्या सत्रात परिवर्तनवादी कवी-लेखक-अभंगकार-वक्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलन होईल.सूत्रसंचालन रोशन गजभिये करतील तर निमंत्रित कवी सौ.शारदा अरुणराव गणोरकर,पुष्पाताई बोरकर,संजय मोकळे,मायाताई वासनिक (गेडाम ),नकुल नाईक, विलास थोरात,केशवराव गायकवाड,निर्मलाताई काळबांडे, रोशन गजभिये,गोविंद फसाटे, प्रवीण कांबळे,नंदकिशोर दामोधरे,पंचशील नकाशे, राजाभाऊ हातागडे,सुनीता मेश्राम,विजय मोहोड,देवीलाल रोराळे आणि बंदिजन कवी मित्र आपल्या विद्रोही व परिवर्तनवादी काव्यरचना सादर करतील.
“२१ वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातून समताधिष्ठित मानवतावादी विचारांचा जागर ” होणार असल्याचे संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी मत व्यक्त केले.या साहित्य संमेलनात सत्यशोधकांचे सत्कार,पुस्तक प्रकाशन,बंदीजणांना प्रमाणपत्र वितरण इत्यादी कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे.शेवटच्या समारोपीय सत्रात ठराव वाचनानंतर कारागृह अधिक्षक श्री.डी.एन.खरात यांच्या समारोपीय भाषणाने संमेलनाची सांगता होईल,असे एका पत्रकाद्वारे संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी कळविले आहे.
—————————————-
प्रति ,
मान्यवर संपादक ,
दैनिक —————–अमरावती .
स .न .वि . वि .
उपरोक्त वार्ता आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित
कराल,ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
प्रा.श्रीकृष्ण बनसोड
संयोजक
21 वे महात्मा फुले राज्यस्तरीय
सत्यशोधक साहित्य संमेलन
मो नं . : ९७६३४०३७४८ .