पुजाऱ्याची हत्या प्रकरणात असलेला कोरोना पॉझिटिव्ह आरोपी फरार

34

🔺बीडच्या कोव्हिड केअर सेंटरमधून पलायन

✒️अंगद दराडे(बीड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.29जुलै):-.केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील पुजाऱ्याचा खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी (दि.29) हा आरोपी कोव्हिड केयर सेंटर मधून फरार झाला असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
केज तालुक्यातील दहिफळ ववडमाऊली येथील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून आरोपीस अटक करण्यात आली होती.
22 जुलै रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला आयटीआयमधील कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते. मात्र याच वेळी त्याने संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळ काढला. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्या त ही एक खळबळ उडाली आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्याची चार दिवसातील ही द्सुरी घटना आहे. शनिवारी (दि. २५) एका कुख्यात दरोडेखोराने बीडच्या कोव्हिड केअर सेंटरमधून पलायन केल्याच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनांस बसलेला हा दुसरा धक्का आहे.