✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.29जुुुलै):- राज्यसभा भवनात मा.खा.उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रिय कुलावंतस जाणता राजा सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष केला आणि लगेच महाशय उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू यांनी सदनात शिवरायांच्या नावाचा जयघोष करु नका. हे माझे सदन आहे असं म्हणून शिवरायांचा अपमान केला. हि घटना घडून तीन ते चार दिवस उलटले तरीही माननीय महाशय उपराष्ट्रपती आणि भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झाला नाही व त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नाही तरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण त्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष राज्यसभेत का होऊ नये राज्य भवन कुणाच्या बापाचे नाही ते छत्रपती शिवरायांनी घडवलेलं हिंदवी स्वराज्यात आहे आणि त्या ठिकाणी जर हिंदवी स्वराज्याचा दैवताचा अपमान होत असेल तर ही घटना आम्ही सहन करु शकत नाही माननीय महाशय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा शंभुसेना युवा आघाडी धुळे व शंभुसेना युवा आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष भाऊसो.जयदिप लौखे-मराठे यांनी या घटनेचा जाहिर निषेध नोंदवला.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED