अग्रनी सोशल फौंडेशन च्या वतीने ‘संविधान दिन’ साजरा

116

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड -:महिला हिंसाचार विरोधी अभियान व भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने अग्रणी सोशल फौंडेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी बहुजन नेते प्रमोद क्षिरसागर,प्रसिद्ध निवेदक व युवा नेते गणेश धेंडे, सरपंच लक्ष्मीताई पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी प्रथम संयोजिका अपेक्षा सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,त्यानंतर सीआरपी शुभांगी काळे यांनी महिला हिंसाचाराबाबत माहिती दिली.महिला कार्यकर्त्यां विद्या घाडगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा सांगितला,संचालिका यास्मिन पिरजादे यांनी महिला हिंसाचाराच्या विरोधात प्रतिज्ञा वाचन केले तर संघटक सागर माने यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली.यावेळी संविधान गुणगौरव परिक्षा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये २५ महिलांचा सहभाग होता. सदर कार्यक्रमात २० कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन अभिनव पद्धतीने संविधान प्रास्ताविकेचे सादरीकरण केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संचालिका शोभाताई लोंढे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव मुनीर शिकलगार यांनी केले.शेवटी सामुहिक राष्ट्रगीतगायन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संयोजन मनिषा गुजले, जयमाला चव्हाण,शुभम ऐवळे यांनी केले.