मराठवाडा स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा-महाराष्ट्र कार्यकारी सदस्य शिवराज पैठने यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

54

 

अनिल साळवे,प्रतिनिधी

गंगाखेड( प्रतिनिधी)बहुजन समाज पार्टी आयोजित मराठवाडा स्तरीय सर्व पदाधिकारी,कार्यकर्ता व समर्थक यांचे संमेलन आयोजित करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथील वंदे मातरम सभागृह सुभेदारी विश्रामगृह दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मा.शिवराज पैठने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे. सामाजिक परिवर्तन आर्थिक उन्नती या बहुजन महापुरुषाच्या ध्येयप्राप्तीसाठी बहुजन समाज पार्टीने वेळोवेळी आंदोलने केली असून संत गुरु महापुरुषांचाही सन्मान केला आहे.वर्तमान काळामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहेण मायावतीजी यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू असून याचाच एक भाग म्हणून मराठवाडा खानदेश विभाग स्तरीय कार्यकर्ता संमेलन आयोजित केली आहे.त्यामुळे
बहुजन समाज पार्टी मराठवाडा स्तरीय कार्यकर्ता संमेलनात बहुजन समाज पार्टीचे मार्गदर्शक तथा कॉर्डिनेटर मा.आकाश आनंदजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मा.खासदार डॉ.अशोकजी सिद्धार्थ,बहुजन समाज पार्टीचे कॉर्डिनेटर महाराष्ट्रचे मा.नितीन सिंहजी,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा. मनीष कावळे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.एड.संदीपजी ताजणे, महाराष्ट्र कार्यकारी सदस्य मा. भीमजी जोंधळे,परभणी जिल्हा प्रभारी सुनीलजी कोकरे,जिल्हा प्रभारी अशोक वायवळ,परभणी जिल्हाध्यक्ष इंजिनियर अनिरुद्ध रणवीर,यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार असल्यामुळे ‘चलो संभाजीनगर चा नारा ‘देत संमेलन यशस्वी करण्यासाठी विधानसभा प्रभारी राहुल मस्के,विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ सावंत, विधानसभा गंगाखेड प्रसंजीत मस्के प्रयत्न करत आहेत.