संकटकाळी मदतीचा हात

108

 

अनिल साळवे,प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी )गंगाखेड तालुक्यातील गौडगावं येथील शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी लक्षमन कराळे या ऑटो चालकचा अपघाती निधन झाले त्याच्या पश्चात आई, पत्नी, आणि दोन मुले असा परिवार असून मोठी मुलगी सातवीत तर छोटा मुलागा पाचवीला असून या कुंटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आशा वेळी संकट काळी मदतीचा हात देणारे भा. ज. प. चे ग्रामीण जिल्हा अध्येक्ष संतोष (भाऊ )मुरकुटे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व कुटुंबाचे सात्वान करून मदतीचा हात म्हणून पन्नास हजाराची भेट दिली तसेच कराळे यांच्या दोनी मुलांना दत्तक घेऊन मुलांची शिक्षणा ची जवाबदारी स्वीकारली असून कराळे यांच्या घर प्रपंच साठी रुपये पंचेवीस हजार व मुलाच्या वसतिगृहा ची फिस पंचेवीस हजारअशा प्रकारे एकूण पन्नास हजारची मद्दत करण्यात अली यावेळी संतोष (भाऊ )मुरकुटे सोबत मनसे चे बालाजी मुंढे, रबदाडे मामा, इस्माईल इत्यादी उपस्थित होते.