समतापर्व२०२३अंतर्गत गंगाखेड मध्ये समाज प्रबोधन पर बार्टी च्या वतीने विविध उपक्रम

84

 

 

अनिल साळवे,प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी) परभणीजिल्हा परिषद,पंचायत समिती गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांच्यास्मृती दिनानिमित्त अभिवादन व प्रबोधन कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात समता पर्व२०२३अंतर्गत संविधान जागर करत महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी जिल्हा परभणीच्या वतीने बार्टीचे महासंचालक सुनील वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली २६नोव्हेंबर’संविधान दिवस’ते ०६डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस’समतापर्व-२०२३अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा फुले यांच्या स्मृती दिनी अभिवादन करून प्रबोधन करण्यात आले. यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी महात्मा फुले यांना अभिवादन करत महात्मा फुले यांचे विचार आजच्या काळातही कसे प्रेरणादायी आहेत हे सांगून महात्मा फुले यांच्या विचाराला उजाळा देत महात्मा फुले यांनी सांगितलेला सत्यशोधक माणसाचा खरा धर्म कसा असावा त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज स्थापनेमध्ये सर्व माणसांना समान मानले पाहिजे,कोणालाही जातीवरून कमी लेखू नये,स्त्रीया व शूद्रांतीशूद्र या समाज घटकांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले. सत्यशोधक समाजामध्ये सत्य वागणारा सत्यवचनी’माणूस होय अशी महात्मा फुल्यांची धारणा होती,यावेळी महात्मा फुल्यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर माहिती दिली व त्यांचे कार्य कसे प्रेरणादायी आहे हे सांगितले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिना मुंढे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गजेंद्र भोसले,पत्रकार राहूल साबणे, उमाशंकर वाकडे,एस व्ही कुलकर्णी,बी.आर.वलसटवार,ए. डी.लहाने,व्ही.एन.देवकते यांची उपस्थिती होती,तर उपस्थितांचे गजेंद्र भोसले यांनी आभारही मानले.तसेच पंचायत समितीच्या सभागृहातहि महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी यावेळी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत महात्मा फुले यांचे विचार प्रत्येकानेअंगिकरावे असे सांगून भारतीय संविधानाची ओळख करून दिली.संविधानाने आपल्या हक्क अधिकाराचे रक्षण केलेले आहे.आपल्या सर्वांनाभारतीय संविधानाने पोटाशी धरले आहे त्याच्या पाठीशी उभे रहाणे एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांचे कर्तव्ये आहे असे सांगितले. प्रबोधन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदचे समन्वयक शिल्पा कोतंबे,के.डी.मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.