हिंगोली लोकसभा मतदार संघात रामदास पाटील सुमठाणकर यांचे संपर्क अभियानाने विरोधकाचे धाबे दणानले

75

 

महागांव तालुका प्रतिनिधी – किशोर राऊत

 

हिंगोली मतदार संघात रामदास पाटील सुमठाणकर यांचे झंझावती संपर्क अभियान सुरु केले आहे हिंगोली, पासुन ते किनवट ,माहुर पर्यंत पक्षातील कार्यकर्ते, मित्रपक्षातील कार्यकर्ते सह मतदार संघातील जनतेसोबत संपर्क अभियान सुरु केले असल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे हिंगोली मतदार संघ भाजपमय झाला आहे संपूर्ण मतदार संघात रामदास पाटील सुमठाणकर यांचे नावाची चर्चा सुरु असल्यामुळे विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवाराचे धाबे दणानले आहे रामदास पाटील सुमठाणकर याची उमेदवारी इतर पक्षातील उमेदवारापेक्षा सरस ठरणार असुन रामदास पाटील सुमठाणकर यांचे संपर्क अभियान जोरात सुरू असल्याने त्यानी संपुर्ण मतदार संघ पिंजुन काढला आहे