एड.बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करा असे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंगाखेड मध्ये जाहीर निषेध.

108

 

 

अनिल साळवे,प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी)पुणे येथे पत्रकाराची संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हणाले “तीन डिसेंबर नंतर महाराष्ट्र राज्यात दंगली होतील” असं म्हणणारे वंचित बहुजन आघाडीचे एड.बाळासाहेब आंबेडकर यांना अटक झाली पाहिजे.दंगलीचे कारण आपणास माहित असेल तर आपण शासनास माहिती सांगितली पाहिजे,दंगलीचे एड.बाळासाहेब आंबेडकर यांना अटक झाली पाहिजे असं वक्तव्य केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना आपल्या भावना लेखी निवेदन देऊन व्यक्त केले आहेत असे वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात तहसीलदार गंगाखेड यांना कळविले आहे.निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ तायडे, तालुकाध्यक्ष आकाश पारवे,युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत कदम, शहराध्यक्ष सय्यद बिलाल, तालुका उपाध्यक्ष नितीन कांबळे, तालुका महासचिव सुनील सोळंके, युवा नेते गजानन पारवे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, निहाल पठाण, अनिल माने, संघपाल पंडित इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.