दलित वस्तीसुधार योजना सिमेंट रस्त्याचे काम अन्यत्र बदलविले! समाज कल्याण अधिकारी मार्फत चौकशी करण्याची मागणी

146

 

 

महागांव तालुका प्रतिनिधी-किशोर राऊत

 

महागाव- दलित वस्तीचा विकास व्हावा यासाठी शासनाने दलित वस्ती सुधार योजना सुरु केली आहे दलित वस्तीसुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते व इतर काम केले जाते अशाच प्रकारे मौजा उटी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काम ठरलेल्या ठिकाणी करावयाचे असताना मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पदाचा दुरुप्रयोग करुन रस्त्याचे काम अन्यत्र खेले आहे दलित वस्ती सुधार योजना ही प्रस्थापिताच्या प्रभावाखाली राबवित असल्याने ही योजना कमकुवत करुन वाटेल त्याठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम करुन या योजनेला अपहाराचे ग्रहण लावले आहे सदर काम अंदाजपत्रकानुसार न करता आपल्या अधिकारात अन्यत्र करण्यात आले आहे दलितवस्ती योजनेचे काम करण्यापुर्वी दलित वस्तीमधील दलितची सभा बोलावून बहुमतात काम करावे असे शासनाचे परिपत्रक असताना मात्र मनमानी पध्दतीने योजनेला कमकुवत करीत असल्याने ही योजना कुछकामी ठरली आहे त्याच प्रमाणे या योजनेचे काम अन्यत्र केल्याने या योजनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे गेल्या चार वर्षापासुन दलित वस्ती मध्ये कुठलाही विकास झाला नसल्यामुळे दलितवस्त्या भकास झाल्या आहेत चार पाच वर्षापुर्वी झालेले रस्ते तोडफोड केल्यामळे या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे जागोजागी सांडपाण्यामुृळे डबके साचल्याने कुठलेही अज्ञात आजार होण्याची शक्यता असल्याने दलित वस्तीमधील आरोग्य धोक्यात आले आहे आजही दलित वस्ती मध्ये दिवाबत्ती पाणी रस्ते नादुरूस्त असल्याने दलीताचे जीवन असुरक्षित झाले आहे दलीत वस्तीकरीता आलेला निधी अन्यत्र खर्च होत असल्याने दलित वस्ती विकासापासुन कोसो दूर आहे .दलित वस्तीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन दलित वस्तीकरीता आलेला निधी अन्यत्र खर्च होत असल्याने दलिताचे हक्क अधिकारावर गदा येत आहे तेव्हा सदर बाब गंभिर समजुन अन्यत्र करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची समाज कल्याण विभागामार्फ़त चौकशी करुण अन्यत्र केलेल्या कामाची वसूली करुण कारवाई करावी आशी जनतेची मागणी आहे