नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.८० टक्के

41

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.३१जुलै):– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयाचा निकाल ९५.८० टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेत प्रथम कु. ललिता सुरेश शेंडे (९२.०० टक्के), द्वितीय कु. अंकिता विलास उपरकर (९०.६० टक्के), तृतीय कु. ख़ुशी राहुल पोपटे (९०.६० टक्के), चौथी कु. रेश्मा दिलीप पिसे (८८.२० टक्के) व पाचवी कु. सानिया बालकदास पाटील (८८.०० टक्के) गुण प्राप्त करून यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन व भावी आयुष्याच्या शुभेच्छा संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.