चिमुर येथील चहाची टपरी चालक कोरोना बाधित

5

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.31जुलै):-येथे चहाचे दुकान चालविणारा व्यक्ती आज (दि.31जुलै) रोजी कोरोना अँटीजन चाचणीत कोरोना पॅसिटीव्ह आढळला असल्याची माहिती चिमुर तालुका वैधकीय अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम यांनी दिली.

  चिमुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत असून आज (दि.31जुलै) रोजी चिमुर येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात चहाचे दुकान चालविणाऱ्या 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अँटीजन चाचणीचा अहवाल पोसिटीव्ह आला आहे. 

  या व्यापाऱ्यांचा संपर्क संपूर्ण चिमुर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांन सोबत असल्याची चर्चा जनता करीत आहे.