✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.31जुलै):-चिमूर शहरात कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तसेच रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने नगर परिषद चिमूर क्षेत्रात दिनांक 1 आगष्ट 2020 ते 2 आगष्ट 2020 या दोन दिवसांकरिता कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. मेडिकल आणि दवाखाने चालू राहतील या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक सेवा सोडून इतर कुठल्याही कारणाने बाहेर पडू नये असे आवाहन चिमुर नगरपरिषदेने केले आहे.

वरील आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था ,समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी सूचना मुख्याधिकारी यांनी केली आहे.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED