जीवनामृत जागतिक स्तनपान दिवस

  46

  आई होणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि आईची ऊपमा आपण शब्दात न केलेले बर. आई बद्दल आदर प्रत्येकांना आहे व असतोच. आईचे वर्णन मी करूच शकणार नाही. “आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या हळुच पुन्हा पान्हा “आई होणे पण एक भाग्याची गोष्ट आहे. ते आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या गर्भात ठेऊन, बाळाला जन्म घालते, सर्व आईस माझे आव्हान आहे की आपण आपल्या बाळाला स्तनपान करणे हे बाळासाठी एक वरदान आहे, बाळासाठी नैसर्गिक वरदान आहे. बाळासाठी ‘जिवनामृत’ आहे .स्तनपान करणे ही एक आवश्यक बाब आहे. आपण आपल्या ब्राळाला नवजात जन्माला येणार्‍या बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अत्यंत गरजेचे व उपयुक्त असते. आईच्या दुधात जे सामर्थ्य आहे ते जागतल्या कुठल्याही प्रकारची घटकात नाही. आपण जागतिक पातळीवर राष्ट्रीय पातळीवर काही वैशिष्ट्यपूर्ण दिवस मानले जातात .त्यातील सगळेच काही हौसेमौजेचे नसतात.तर बरेच जागृकता निर्माण करणारे असतात. अशा प्रकारच्या वर्षभरातील एकूण दिना सोबत अनेक सप्ताह यामध्ये ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्ती, व्यसनमुक्ती एक ना अनेक सप्ताह आपण उल्लेखनीय निमित्ताने साजरे केले जातात. नवजात जन्मणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अत्यंत गरजेचे असते. आईचे दूध हे बाळासाठी जीवनामृत आहे. मातेच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये समाविष्ट असतात.मातेच दूध नवजात बाळासाठी अनेक उपयुक्त आहे. आईच्या दूधात बाळाच्या वाढीसाठी व रोगप्रतिकारक्षमता वाढीसाठी उपयोगी असते .फायदेशीर आहे .यामध्ये संपूर्ण आहार दुधामधून बाळासाठी मिळत असते. आईचं त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते . बाळाला रोगापासून बचाव करते. बाळाची वाढ होण्यास मदत करते.

  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एका तासापासून ते महिन्याचे बाळ होईपर्यंत आईच्या दुधावर वाढविली पाहिजे. त्यानंतर निदान दोन वर्ष आईच्या दुधासोबत पूरक अन्न असे बाहेर आणला त्याला मिळायला हवे. तर त्याची सुदृढ वाढ होते. बऱ्याच खेड्यापाड्यातील माता याचे पालन करतात .पण शहरी भागातील माता बालकांना स्तनपासून वंचित ठेवतात .त्यामुळे लहान बालकांचे कुपोषण होते व कुपोषित बालक कालांतराने दगावतात. स्तनपान तर बाळासाठी एक वरदान आहे. आई होणे हे एकदा नैसर्गिक वरदान आहे. आई ही एक प्रकारची देणगी आहे नैसर्गिक आहे. आणि स्तनपान करणे ही पण एक नैसर्गिक मार्ग आहे . त्यासाठी मातापित्यांनी योग्य शिक्षण मिळायला हवे जेणेकरून ते बालकांच्या त्यांच्या हक्क बहाल करु शकतील. शहरातील माता हे आपल्या बाळांना वेळेवर दूध पाजत नाही .कारण त्या नोकरीवर कंपनीत बाहेर कामासाठी त्यांना जावं लागतं .अशा परिस्थितीमध्ये शहरी भागातील माता ह्या आपल्या बाळाला आठ-नऊ तास संगोपनासाठी आया किंवा बाळ संगोपन संस्था ह्याकडे सोपीवीतात. या प्रसिद्ध आया किंवा संस्थान बाळाला दूध पावडर किंवा गाईची दूध देतात .पण त्याहीपेक्षा बाळाला आईचे दूध हेच नैसर्गिक उत्तम आहे .या परिस्थितीमध्ये बाळाला आपल्या आईचे दूध मिळत नाही. हे एक वास्तविक आहे. याला आपण नाकारू शकत नाही. बाळाला स्तनपान केल्याने मातेची नैसर्गिक आरोग्य चांगले असते . माता निरोगी बाळ सुदृढ निरोगी राहते. एवढे सामर्थ्य आईच्या दुधात आहे. ते सामर्थ्य इतर दूध पावडर च्या दुधामध्ये नसते. बाहेरील दुधात किंवा दूध पावडर मधील बाळाला दूध पाजले तर बाळाचे पोट भरेल परंतु बाळाच्या वाढीसाठी ,विकासासाठी ,आवश्यक घटक असतात ते इतर दुधात किंवा कशातही नसतात. म्हणून आपल्या बाळाला स्तनपान करणे हे एक उत्तम आहे.
  जागतिक आरोग्य संघटना (WHO) 1990 पासून हा कार्यक्रम सुरू केला. आहे 1ऑगस्ट ते 7ऑगस्ट जागतिक स्तनपान दिन साजरा व्हावा अशी संकल्पना आहे.
  समस्त आई स माझे नम्र आव्हान व विनंती आहे की आपण आपल्या बाळाला स्तनपान करणे हे एक उत्तम नैसर्गिक आहे.
  ✒️गजानन गोपेवाड
  अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य