मद्यधुंद पीक अप चालकाने दोन मुलांना चिरडत गाडी घातले घरात

    40

    ?एका मुलीचा जागीच मृत्यू तर दुसरा मुलगा गंभीर जखमी

    ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
    मो:-8698648634

    गोंडपिपरी(दि.31जुलै):- तालुक्यातील नवेगाव वाघाडे इथे खूप मोठा अपघात झाला असून एका छोट्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एका मुलाला चंद्रपूरला हलविले आहे. मृत मुलीचे नाव कू. निथी पंढरी मेश्राम असून जखमी मुलाचे नाव अश्मित बंडू मेश्राम असे आहे. ही घटना दि. ३१ जुलै रात्री नऊ ते दहा च्या सुमारास घडली आहे. नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम यांच्या घरचे जेवण करून बाहेर बसून आराम करत असताना मद्य पिऊन चालक चंद्रपूर कडून पीक अप (MH 33 G0560) ही गाडी भरधाव वेगाने आली. रस्त्याचा बाजूला कु. निथी पंढरी मेश्राम व अश्मित बंडू मेश्राम हे दोघे जण बसून होते. बाकी घरचे व्यक्ती घरात होते. अश्यात वेगाने ही पीक अप आली व त्या दोन्ही मुलांना चीरडत नवीन बांधकामाच्या नाली तोडत पंढरी मेश्राम यांच्या दारात उलटली. गाडीचा आवाज ऐकून बाहेर बघितले तर त्या दोघांचाही अपघात झालेला. ही माहिती कळताच गावकऱ्यांनी जवळच्या गोंडपिपरी पोलिस स्टेशन ला कळविले. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप ढोबे साहेब यांनी लगेच येऊन जखमी मुलाला दवाखान्यात हलविले. मात्र त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. अश्या घटना घडणे दुर्दैवी असून मद्यपान करून गाडी चालविल्याने त्या गाडी चालकाला कठोर शिक्षा व्हावी असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.