चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम

32

🔸पाच प्रेस फोटोग्राफर्सचा कोविड योद्धा रुपात सन्मान

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.1ऑगस्ट):-चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन नव्या इमारत सभागृहात करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव प्रशांत विघ्नेश्वर, ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे, यशवंत मुल्लेमवार ,प्रमोद काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर यांच्या प्रेरक विचारांचा मागोवा अध्यक्ष तुमराम यांनी आपल्या भाषणातून घेतला. कोविड काळात जीव धोक्यात घालून माध्यमात काम करणाऱ्या प्रेस फोटोग्राफर तेजराज भगत, देवानंद साखरकर, चिन्ना बामनंटी, रमेश सोनटक्के, संजय बाराहाते यांचा या कार्यक्रमात कोरोना योद्धा रुपात पुस्तक देत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आशीष अम्बाडे यांनी केले तर आभार सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ सदस्य, इलेक्ट्रॉनिक, पोर्टल बातमीदार आणि माध्यमकर्मींची उपस्थिती होती.