🔸दुध व भुकटीला अनुदान देण्याची मागणी

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज साठ लाख लिटर दुध पिशवी बंद हे चाळीस रूपये लीटर दराने विकले जाते माञ हेच दुध शेतकरी वर्ग यांच्या कङुन सतरा ते अठरा रूपये लीटर दराने खरेदी केले जात आहे दुध संघ संकलनद्वारे शेतकरी वर्ग यांची लुट करून नफा कमवत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावरगाव येथे दुधाला प्रति 10 रुपये अनुदान दिले पाहिजे दुधाला 30 रुपये भाव तर भुकटीला प्रति किलो पन्नास रुपये अनुदान दिले पाहिजे यासाठी शांततेत आंदोलन करण्यात आले.आज दुधाला कवडीमोल भाव असल्याने जोड धंदा करण्यासाठी अतिशय बिकत अवस्था झाली आहे. जोडधंदा करण्यासाठी परवडत नाही ही बाब भाजपा पक्षाने लक्षात घेऊन शांततेत आंदोलन केले. सरकारचा निषेध म्हणून गरिबांना दूध वाटप करून महाविकास आघाडी सरकार चा निषेध नोंदविला. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष आनंद शिंदे ,दिनेश परदेशी ,तालुका अध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, सरचिटणीस संतोष काटे, किसान मोर्चा आघाडी बाळासाहेब शिंदे, श्रीकांत खंदारे , युवराज पाटोळे,नामदेव शिंदे ,नारायण राऊत, अण्णासाहेब काकड, रवी काटे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED