महेंन्द्रसिह राजपूत यांची करणी सेना महाराष्ट्र राज्य सोशल मिङीया उपध्यक्ष पदी निवड

16

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑगस्ट):-शिरपूर तालुक्यातील निर्भिड़ विचार न्युज संपादक महेंद्रसिंह राजपूत यांची नुकतीच करणी सेनेच्या महाराष्ट्र सोशल मिङीया उपध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे सदरची नियुक्ती करणी सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अतुलसिह परदेशी यांनी जाहीर केली आहे. महेंद्रसिंह राजपूत यांनी शिरपूर तालुक्यातुन आपले निभिॅङ विचार वृत्तपञ च्या माध्यमातून पञकारीकेला सुरवात करून आपल्या निर्भिड़ व रोखठोक लिखाणातून नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आवाज बुलंद केला आहे आजपर्यंत निर्भिड़ विचार न्युज सोशल मिङीया माध्यमांतुन प्रसारित होत असुन राज्य भरात त्यांची व्याप्ती पसरली आहे देशभरात व विदेशात वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने म्हणून संघटनेने पञकारीता क्षेत्रातील आजपर्यंत निर्भिड़ निस्वार्थपणे केलेले काम समाजकार्य निष्ठावंत पाहुन करणी सेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष अतुलसिह परदेशी यांनी निवड जाहीर केली आहे. ह्या पदाचा वापर आपण समाजकार्य समाज हित सामान्य वर्गाच्या न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे अशी अपेक्षा वरीष्ठ पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे संघटनेसाठी कार्य करत असताना संघटनेचे मुलभुत तत्व. समाजकार्य समाजहित समाज संघटन आणि राष्ट्रीय हित साध्य होईल आणि कोणत्याही प्रकारे संघटनेची बदनामी न होता सामान्यवर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचार ला वाच्या फोडण्यासाठी आपण प्रयत्न शिल राहु असे महेंन्द्रसिह राजपूत यांनी स्पष्ट केले आहे.