गाईचा दुधाला व भुकटी निर्मितीस अनुदान द्यावे

13

🔹भारतीय जनता पार्टीने केले आंदोलन

✒️ आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.1ऑगस्ट):- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या आदेशा वरुन तसेच लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितम ताई मुंडे सुचनेवरुन भारतीय जनता पार्टी किल्ले धारूर च्या वतीने गायीच्या दुधाला प्रतिलिटर १०रु अनुदान द्यावे ,दुध भुकटी निर्मीतीस ५० रु अनुदान द्यावे, दुध खरेदीचा दर ३०रू द्यावा तसेच शेतकरी यांना पिककर्ज त्वरीत मिळावे म्हणून *भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी साहेब* यांच्या नेतृत्वाखाली धारूर तहसील येथे अंदोलन करण्यात आले सर्व मागण्यांचे निवेदन मा.तहसीलदार यांना देण्यात आले तसेच अंदोलनासाठी आणलेल्या दुधाची नासाडी न करता नजीकच्या राहात असलेले वृध्द व बालकांना मोफत दुधाचे पिशव्यांचे वाटप करून महाविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला. यावेळी बाजार समीती सभापती महादेव आण्णा बडे ,मा. सभापती अर्जून तिडके,उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , उपसभापती सुनिल शिनगारे, भाजपा तालुका अध्यक्ष अंगदराव मुंडे,अॅड.बालासाहेब चोले, भाजपा शहराध्यक्ष दत्ता भाऊ धात्रे, किसान मोर्चा प्रमूख रामप्रभु मुंडे,युवा मोर्चा अध्यक्ष अॅड.मोहन भोसले, जिल्हा बॅक संचालक महादेव तोंडे, बाजार समीती संचालक रमेश नखाते,अॅड. नवनाथ पांचाळ, प्रकाश सोळंके तसेच दादासाहेब घोळवे , विनायक शिनगारे किशोर थोरात व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते