जिल्हयात नवीन 29 कोरोना बाधित आढळले

17

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.1ऑगस्ट):-जिल्हयात आज सीआरपीएफ अहेरी येथील बटालीयनचे 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच धानोरा पोलीस स्टेशन मधील 13, गडचिरोली येथील एक महिला व एक भाजी विक्रेता, जिल्हा सामान्य रूग्णालयातील दोन कर्मचारी, आष्टी येथील एक वेल्डींग दुकानदार व विलगीकरण्यातील जम्मू कश्मिर येथून परतलेला एकजण कोरोना बाधित आढळून आला.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 181 झाली. तर एकुण बाधित संख्या 606 झाली. आत्तापर्यंत एकूण 424 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.