वीज पडल्यामुळे कन्हाळगाव येथिल महिलेचा मृत्यू

25

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(2 ऑगस्ट): तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कन्हाळगाव येथील महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी घडली.
मृत महिलेचे नाव मंजुळा रामकृष्ण मुरस्कार असून ही दहेगाव (रिठ) या शेतीशीवारात कामाला गेली होती. काल सायंकाळी 4 ते 5 वाजताचे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आला,यात ही घटना घडली.