राशन दुकानदार ची दुकान वेळा पत्रक व धान्य देत नसल्यामुळे केली तक्रार

286

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि. १३ फेब्रुवारी):-शासनाकडून गरीबांना अन्न सुरक्षेचा लाभ देण्यात येतो परंतु अमंलबजावणीत दुकानदारांच्या बऱ्याच तक्रारी येतात.दुकानदाराने माहे जानेवारी चे धान्य दिले नाही धान्य संपले.

तुला देत नाही कुठे जायचे जा.. तक्रार कर अशा उद्धट भाषेचा वापर करून दुकानातुन बेइज्जत करून हाकलून दिले. दुकानदार दुकान कायद्यानुसार चालवित नसून महिन्यात ७ – ८ दिवस चालू ठेवतो.

मोठ्या मोठ्या लाईन लावून तासन तास उठे करतो या मुळे काही जेष्ठ महिला चक्कर येवून पण पडल्या आहेत .तरी त्यांचेवर योग्य कार्यवाही करून मला न्याय मिळवून देण्यात यावे.

अशी तक्रार तहसीलदार उमरखेड यांनी दिनांक १ फेब्रुवारी ला करून ही पुरवठा विभाग कडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

अशी माहिती तक्रार कर्ता – शेख मुख्तार शे हबीब ताजपुरा यांनी केली .नसीमा बानोशेख मुख्तार ,राशनकार्ड नं. ५१३१४४ R C नं.२७२०२८२७७२७० यांनी स्वस्त धान्य दुकानदार व्हि. जी. तेला यांची तक्रार तहसीलदारा सह अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा कडे ऑनलाईन तक्रार केली आहे.

सध्या धान्य व आनंदाचा शिघा वाटप सुरु असून दुकानदारांच्या व्यवहारात कोणताही बदल घडला नसून आज ही तशाच प्रकारे लाईन लावून लवकरात लवकर वाटप करून पुन्हा दुकान किती दिवस चालू ठेवावी ह्या कायद्याची पायमल्ली करत आहे .

शहरातील सर्वच दुकानदार साठा मिळाल्या नंतर आठवडा भरात धान्य घेण्यासाठी दबाव टाकून बाकी दिवस दुकान बंद ठेवतात नियमा प्रमाणे महिन्यात २४ दिवस दुकान चालु ठेवणे बंधनकारक आहे.नियमा प्रमाणे दुकाने चालू ठेवण्याची लाभार्थी कडून मागणी होत आहे.