त्रिमली ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित आरपीआय पदाधिकारी व पोलीस निरीक्षक यांचा सत्कार

  120

  *सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

   

  म्हसवड : खटाव तालुक्यातील औंध परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी स.पो.नि. केंद्रे यांची निवड झाली आहे. तसेच त्रिमली गावचे सुपुत्र सुनील भालेराव यांची रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्यामुळे या दोघांचा त्रिमली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  खटाव तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून त्रिमली गावाकडे पाहिले जाते. गावामध्ये सामाजिक सलोखा व सर्वधर्मसमभाव पाळला जातो. एवढेच नव्हे तर विकास कामांसाठी सर्वांना संधी मिळावी. या भावनेतून सर्वसाधारण जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संधी देऊन एक विधायक उपक्रम राबवला आहे.
  या गावांमध्ये विकास कामे करत असताना कोणताही दुजाभाव न करता प्रामाणिकपणाने राजकारण विरहित निर्णय घेतला जातो. या गावातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून गावचं नाव करावं. अशी सर्व ग्रामस्थांची मनोभावे विनंती आहे. या गावच्या विकासासाठी अनेकांनी आपलं खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचाच आदर्श घेऊन गावामध्ये एकोपा निर्माण करावा. अशी सूचना यावेळी मान्यवरांनी केली.
  त्रिमली गावचे सुपुत्र पॅन्थर सुनील भालेराव यांची रि.पा. ई.(आठवले) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य पदी निवड

  मा. पॅन्थर सुनिलजी भालेराव तसेच औंध पोलीस स्टेशनचे नवीन स .पोलीस निरीक्षक मा.केंद्रे यांचे त्रिमली ग्रामस्थांनी स्वागत करून सत्कार केला.
  मा. पॅन्थर सुनिलजी भालेराव आपले संपूर्ण आयुष्य चळवळी साठी व्यतीत करत आले आहेत सुरुवातीला दलित पॅन्थर संघटनेत त्यांनी आपले सर्व तरुणपण घालवले. अन्याय आत्याच्यारावर पेटून उठणारे सुनिल भालेराव मुंबई या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास होते. लोकनेते रामदास आठवले यांचे जवळचे सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी मा. खासदार रामदास आठवले यांच्या आदेशाने नियुक्त करण्यात आली आहे.
  या प्रसंगी त्रिमली गावचे युवा नेते शंकर येवले,तसेच औंधचे नेते दलित मित्र शिवाजी रणदिवे,पॅन्थर सुनील भालेराव, स .पोलीस निरीक्षक श्री.केंद्रे यांनी त्रिमली ग्रामस्थांना संबोधित केले.
  यावेळी हरिदास येवले, अक्षय पवार,विकास येवले,श्रीरंग येवले,रामचंद्र येवले, चंद्रकांत येवले, प्रवीण येवले, तानाजी येवले, दिलीप येवले,सावन भालेराव, सरपंच हणमंत सुतार आणि त्रिमली ग्रामस्थ हजर होते.