रक्षबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन

31

श्रावण महिन्याचे महत्त्व अनेक कवितांच्या मध्येमातून कवींनी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते.सणांनी बहरून आलेला हा महिना वृक्षवल्ली,पशुपक्षी व संपूर्ण सृष्टी वरील सजीवांसाठी आल्हाददायक आहे. ह्याच महिन्यात राखी हा सण येतो .
रक्षबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते.हा सण म्हणजे पराक्रम,प्रेम, साहस व संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यात भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असते.भारतीय सुसंस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील पवित्रतेचा महिमा गायला आहे.जगात आपला देश संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जातो व या देशाची संस्कृती मानवतेचे दर्शन घडविले.स्त्रीची पूजा करणारी आपली संस्कृती आहे.
अभिमनुच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षनासाठी राणी कर्मवतीने हुमायूला राखी पाठवली होती.या रखीमध्ये सुरक्षिततेचि भावना होती.रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे.
आज दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे .सख्ख्या भावालाच राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षनाची जबाबदारी येईल.सुरक्षिततेचि भावना निर्माण होईल.आज समाजात अनेक अनिष्ट घटना घडतात.मानवजातीला काळींबा फासणाऱ्या अनेक घटना आपण प्रसार मध्येमाच्या मध्येमातून ऐकत असतो. यावर मोठयाप्रमाणात आळा बसेल
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा निर्झर झरा होय.बहीण-भाऊ परस्पर पूरक, पोषक व प्रेरक आहेत हे संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा आहे.

✒️सिंधू मोटघरे

जिल्हा समनव्यक अग्निपखं फाउंडेशन महाराष्ट्र
मो. न.9404306224