समर्थ सहकारी साखर कारखान्याचे 38 कर्मचारी कोरोना पॉज़िटिव्ह

26

🔷 11 रुग्णांनंतर 27 कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट पॉज़िटिव्ह

🔷 आरोग्य विभागाचे पन्नास जणांचे पथक शुक्रवारी रात्रभर तळठोकून कार्यरत

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)
मोबाईल नंबर-:9881292081

जालना(दि.2ऑगस्ट):-आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या अंबड तालुक्यातील *समर्थ सहकारी साखर कारखाना*(पूर्वीचे नांव) सध्या कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुशनगरया नावाने असणाऱ्या सहकारी साखर कारखान्यातील अकरा कर्मचारी पॉज़िटिव अहवालानंतर शनिवारी पॉज़िटिव कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस कर्मचाऱ्यांचा अँटीजेन तपासणी अहवाल पॉज़िटिव आला आहे.यामूळे सदरील साखर कारखान्यातील रुग्णांची संख्या 38वर गेल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास रोडे यांनी दिली.
समर्थ कारखान्याचे अकरा कर्मचारी शुक्रवारी रात्री पॉज़िटिव आल्यानंतर तातडीने जालना जिल्हा आरोग्य यंत्रणा अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखाना येथे दाखल झाली .11जणांच्या संपर्कातील आलेल्या 600 कर्मचाऱ्यांची अँटीजेन कोरोना तपासणी शनिवारी सकाळी करण्यात करण्यात आली असून यामध्ये 27कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉज़िटिव आला आहे.यामूळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होऊन सतर्क झाली आहे.
संपर्कातील आलेल्यांची कॉंटेक्ट्स ट्रेसींग चालु आहे.
कोरोना पॉज़िटिव आलेल्या रुग्णांना अंबड येथील कोविड सेंटर येथे ठेवण्यात आले आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कॉंटेक्ट्स ट्रेशिंग चालु आहे.यामध्ये संपर्कात आलेल्या हायरिस्कमधील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना अंबड येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे.असे सूत्रांनी कळवले आहे.
लो रिस्क मधील नागरिकांना होम कॉरनटाईन राहण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
अंबड तालुक्यातील वाढत जाणारी कोरोना पॉज़िटिव रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.यामूळे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर परिसर सील करण्यात आला आहे.