✒️इंदापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

इंदापूर(दि.3ऑगस्ट):-पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पाच महिन्याचे मूल स्वत:चे नसल्याचे सांगून निर्दयी पित्याने बाळाला पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिल्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे घडली. ध्रुव दीपक शिंदे असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.
याबाबत मृत बाळाचे मामा दीपक मच्छिंद्र तांबवे (वय २०, रा. अण्णा भाऊ साठेनगर मोहोळ, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी निर्दयी पित्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज दत्तू शिंदे (रा. वरकुटे, ता. इंदापूर) याचे फिर्यादीची बहीण पूजा हिच्याशी लग्न झाले असून, ती पतीसोबत सासरी वरकुटे येथे राहत होती. धाकटी जाऊ पियू बाबू शिंदे हिच्याशी पूजाचे घरात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून पूजाच्या पतीला पूजाचे दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याने हे मूल तुझे नसल्याचे जावेने सांगितले. त्यावरूनच पूजा घराबाहेर गेल्याचा फायदा घेऊन तिच्या पतीने बाळाला विहिरीत फेकून दिले. पोलिसांनी पिता मनोज दत्तू शिंदे, सासू कांताबाई दत्तू शिंदे व जाऊ पियू बबन शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.

क्राईम खबर , पुणे, महाराष्ट्र, राजनीति, राज्य, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED