शिवीगाळ केली; ढाबामालकाचा नोकराने केला खून

    47

    ✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.3ऑगस्ट):-शिवीगाळ केल्याने नोकराने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून ढाबामालकाची हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी नोकराला रविनगर परिसरात अटक केली.
    प्रवीण सातपुते (वय ४२, रा. महाजनवाडी, वानाडोंगरी) असे मृत ढाबामालकाचे तर निखिल धाबर्डे (वय २९, रा. हिंगणा) असे अटकेतील मारेकरी नोकराचे नाव आहे.
    प्रवीण यांचा मोहगाव झिल्पी मार्गावर तंदुरी नावाचा ढाबा आहे. येथे निखिल हा नोकर आहे. प्रवीण हे सतत निखिलला शिविगाळ करायचे, असे सांगितले जाते. त्यामुळे तो संतापला. शुक्रवारी रात्री प्रवीण व निखिल या दोघांनी जेवण केले. यादरम्यान प्रवीण यांनी निखिलला शिवीगाळ केली. निखिलने लोखंडी रॉडने प्रवीण यांच्या डोक्यावर वार केले. यात प्रवीण यांचा मृत्यू झाला. निखिल हा पसार झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. निखिल पसार असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी शोध घेऊन निखिलला रविनगर चौकात अटक केली. शिवीगाळ केल्याने प्रवीण यांची हत्या केल्याचे निखिलने पोलिसांना सांगितले.