बसस्थानकावर सापडलेल्या पैशातून शिक्षकाकडून रोपाचे वाटप

49

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3ऑगस्ट):-बरबडा येथून जवळच असलेली वाडी (त.ब.) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक संजीव मानकरी हे कोविड-19 चे सर्वेक्षण करुन येत असताना बरबडा बस स्थानकावर त्यांना 200/-(दोनशे रुपये) भेटले असता त्यांच्या मनात असा एक विचार येत होता की भेटलेले रुपयाचे काय करावे.सध्या कोविड-19 मुळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत.मग कोणाला द्यायचा हा प्रश्न मनात येत होता.त्यांनी असा विचार केला की या दोनशे रुपये व आपल्याकडील काही रुपये खर्च करुन एक वटवृक्ष खरेदी करून ग्राम पंचायत बरबडा येथे देण्याचे ठरवले.दुसर्या दिवशी ग्राम पंचायत बरबडा येथे जाऊन गावचे सरपंच श्री.बालाजी मद्देवाड यांच्या हस्ते ग्राम पंचायतच्या प्रांगणात वटवृक्ष लावण्यात आले.गावात मिळालेले रुपये गावातच एक वटवृक्ष देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल सहशिक्षक संजीव मानकरी या शिक्षकांचे प्रामाणिक पणा हे आम्हा सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे.एक आगळा वेगळा उपक्रम राबवून कृतज्ञता दाखवली आहे.असे गावचे सरपंच बालाजी मद्देवाड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी बरबडा शाळेचे व्य.स.अध्यक्ष श्री. भास्कर शिंदे साहेबराव सर्जे केंद्र प्रमुख माधव रेडेवाड,वाडीचे मुअ अशोक जेठेवाड,दादाराव जाधव,देविदास भंडरवाड आदी उपस्थित होते.सह शिक्षक संजीव मानकरी यांचा प्रामाणिकपणा पाहून शिक्षण विस्तार अधिकारी मा.व्यंकटेश चौधरी,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सुरेश पाटील,सुधीर गुठे, अरुण अतनुरे,विजय चव्हाण, एल.डी.शिंदे,रामकृष्णलोखंडे, चंद्रकांत आमलापुरे व शिक्षकवृद आणि गावातून ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.