लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाव दाढी पेढी येथे जयंती उत्साहात साजरी

89

✒️भातकुली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भातकुली(दि.3ऑगस्ट):-लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2020 यानिमित्त आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे बहुद्देशीय संस्था दाढी पेढी, अमरावती यांच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी चिमुकल्यांच्या हातून केक कापून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे, आद्यक्रांतिगुरूवीर लहुजी वस्ताद साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली .या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे आमंत्रीत अतिथी प्रवीण भाऊ गाढवे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी महासंघ तथा ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते अनिल कुमार यांनी या कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या कामगिरीवर त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने प्रकाश टाकत उपस्थित मातंग समाज बांधवांना प्रबोधन करून भविष्यातील येणाऱ्या अडचणींना आपण कशाप्रकारे मात करून एक विकास वाटचाल कशा प्रकारे करू याबद्दल संबोधन केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे संस्थापक राजू भाऊ मधुकर कलाने यांनी आपल्या या छोट्या गावांमधून कशाप्रकारे सर्व स्तरावर म्हणजेच ज्यामध्ये सामाजिक ,राजकीय पत्रकारिता, साहित्य या क्षेत्रात आपले नाव लौकिक कुठल्या वाईट परिस्थितीतून केले आहे.ज्याचा आदर्श भविष्यातील या गावातील युवा पिढीने प्रेरणा घेऊन समाजाचे दिशादर्शक बनण्याचे काम करण्यात यावे असे संबोधन आमंत्रित अतिथींनी या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. यावेळी त्यांनी त्या पद्धतीचे मार्गदर्शन लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक आद्यक्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ मधुकर कलाने गावातील तरुण युवा समाजबांधवांनी गेल्या चार वर्षापासून आपल्या समाजातील महापुरुषांची ही सामाजिक कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवत तसेच अतिशय वाईट परिस्थिती मधूनही आपल्या महापुरुषांना आपण सन्मान मानवंदना त्यांच्या जयंती व पुण्यतिथी विशेष दिनानिमित्त देण्यात त्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. ज्यामुळे गावातील मातंग समाज बांधवांना या सर्व सामाजिक कार्यक्रमातून शैक्षणिक तथा सामाजिक प्रवाहामध्ये अन याकरिता ते अविरतपणे आपले कार्य या छोट्या गावांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून वेळोवेळी दाढी पेढी येथील आपल्या मातंग समाज बांधवांना आपल्या समाजातील महापुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी आपण साजरी करून आपल्या समाजबांधवांना प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून अविरतपणे करीत आहे .त्यामुळे तेव्हा त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष असून कोरोनाच्या या महामारीला तसेच जनता कर्फ्युचे पालन करीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान प्रवीण गाढवे महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसी महासभा, ज्येष्ठ विचारवंत अनिल कुमार, शिक्षक पंडित तेलमोरे ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मधुकरराव कलाने, श्रीकृष्ण तायडे ,मधुकर कलाने ,शिशुपाल धाकतोडे ,डॉक्टर राधास्वामी काळे ,कोषाध्यक्ष लहुजी सोशल फोर्स महाराष्ट्र राज्य, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन मानमोडे , वामन तायडे, बाळू कलाने, मारोती कलाने,दुर्गेश तायडे, अंकुश तायडे, स्वरित काळे, श्रेयस मानमोडे,अभिषेक कलाने, नंदा तायडे , बयना कलाने,प्रणिता कलाने,सुचिता डोंगरे,निकिता डोंगरे, प्रिया कलाने,परी कलाने, माला खडसे,विमला तायडे,रेखा कलाने उपस्थित होते.