🔺चंद्रपूर जिल्ह्यात 597 बाधित; कोरोनाचा दुसरा मृत्यू

🔺372 बाधितांना आतापर्यत सुटी; 223 वर उपचार सुरू

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या सोमवारी सायंकाळी 597 झाली. आता पर्यत 372 बाधितांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. 223 बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यत दोन मृत्यू कोरोनामुळे झाले आहे.

मागील चार दिवसांत कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. एका 72 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गंभीर असल्यामुळे नागपूर येथे हलविण्यात आले होते. रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज पुढे आलेल्या 17 बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 3 बाधिताचा समावेश आहे. यामध्ये बालाजी वार्ड येथील पाणीपुरवठा केन्द्र जवळील 70 वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. तर पोलिस कॉर्टर मधील 37 वर्षे पुरुष, गोल्डन प्लाझा आंबेडकर सभागृह जवळील 29 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे.

जिल्ह्यातील घुग्घुस येथील 17 वर्षीय युवती व वरोरा तालुक्यातील जामगाव खुर्द येथील 32 वर्षीय युवक बाधित ठरले आहे.

आज सर्वाधिक रुग्ण नागभीड तालुक्यातील पुढे आले आहे. एकूण 12 रुग्ण पुढे आले असून यापैकी 9 यापूर्वीच्या पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील आहे. तर अन्य तीन बाहेर जाऊन प्रवास करून परत आलेले आहे.

दरम्यान,केवळ पाच दिवसात जिल्हयात 142 रुग्णांची भर पडली आहे. 2 मेपासून चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला. आधी हळूहळू वाढणारी रुग्णसंख्या पुढे गतीने वाढू लागली. चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिना कोरोना संसर्गाचा महिना ठरला. या महिन्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 2 मे रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर बरेच दिवस जिल्ह्यात दुसरा रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधान होते. त्यानंतर मात्र रुण हळूहळू वाढायला लागले. या काळात म्हणजे मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते.

जुलै महिन्यातच कोरोना रुग्णांचा आकडा 500 पर्यंत गेला. आता ऑगस्ट महिन्यात तर कोरोना संसर्गाने कहर करणे सुरू केले आहे. 29 जुलै रोजी जिल्ह्यात 28 रुग्ण वाढले. त्यानंतर 30 जुलै रोजी 28, 31 जुलै रोजी 28, 1 ऑगस्ट रोजी 29, आणि 2 ऑगस्टलाही जिल्ह्यात पुन्हा नव्या 29 रुग्णांची भर पडली. केवळ पाच दिवसात जिल्ह्यात नव्या 142 रुग्णांची भर पडली.

दरम्यान,जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत. आतापर्यंत 24 हजारांवर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत 24 हजारांवर संशयित व्यक्तींचे नमूने घेतले. चाचण्या वाढल्या तशी रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. जुलै महिन्यात दररोज सुमारे 15 ते 18 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद आहे

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED