६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स

36

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया वर ६ ऑगस्टपासून म्हणजेच गुरुवार पासून अॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरू होत आहे. अॅमेझॉनचा हा सेल खास करुन प्राइम मेंबर्ससाठी असणार आहे. हा सेल ४८ तासांपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्स पर्यंत अनेक उत्पादनावर डिल्स आणि डिस्काउंट देण्यात येणार आहेत. या सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंट देण्यात येणार असल्याने ही संधी दवडू नका. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही या सेलमध्ये देण्यात येणारी सूट आणि डिस्काउंटचा उपयोग करु शकतात. तसेच सोप्या पद्धतीने सामानांवर देण्यात येणारा डिस्काउंट मिळवू शकतात. जाणून घ्या या खास टिप्स बद्दल….

​अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप असणे आवश्यक

६ ऑगस्ट पासून सेल सुरू होणार आहे. परंतु, यासाठी सर्वात आवश्यक म्हणजे तुम्ही अॅमेझॉन प्राइम मेंबरशीप असणे आवश्यक आहे. एका वर्षासाठी या मेंबरशीपसाठी चे चार्ज ९९९ रुपये आहे. तर एक महिन्यासाठी तुम्हाला १२९ रुपये मोजावे लागतील. वोडाफोन आणि एअरटेल च्या काही पोस्पपेड प्लानसोबत ही मेंबरशीप फ्री मध्ये मिळते. जर तुम्ही मेंबर नसाल तर एक महिन्यासाठी, वर्षभरासाठी किंवा वोडाफोन किंवा एअरटेलच्या एखादा प्लान रिचार्ज करून मेंबर तुम्हाला होता येईल. त्यानंतर तुम्हाला या सेलचा फायदा उठवता येईल.

​गरजेचे सामान करा अॅड टू कार्ट

जर तुम्हाला स्वस्त सामान खरेदी करायचे असेल तर ६ ऑगस्टपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. अवघ्या दोन दिवसात हा सेल सुरू करण्यात येणार आहे. तुम्हाला जर गरजेचे सामान खरेदी करायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी Add to Cart करावे लागेल. त्यानंतर सेल सुरू झाल्यास तुम्हाला कमी किंमतीत सामान उपलब्ध होईल. तुम्ही हे ध्यानात ठेवायल हवे की, काही सामान हे अवघ्या काही सेकंदात संपले जातात. त्यामुळे तुम्ही आधीच अॅड टू कार्ट केल्यास तुम्हाला हवे ते सामान मिळेल. अन्यथा तुम्हाला खरेदी करण्याआधीच ते सामान आउट ऑफ स्टॉक होईल.
​जबरदस्त डिल्ससाठी Amazon App ठेवा

या सेलमध्ये अनेक डिल्स अशा असतात की, त्या अॅपवर एक्सक्लूसिव्ह असतात. तसेच अॅपच्या माध्यमातून शॉपिंक करणे सोपे जाते. अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे डेस्कटॉपच्या तुलनेत वेगाने म्हणजेच फास्ट काम करते. जर तुम्ही डेस्कटॉपसाठी Amazon Assistant डाउनलोड करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या सामानाच्या किंमतीची तुलना करता येईल. डेस्कटॉप किंवा मोबाइल अॅपवर तुम्हाला सामान खरेदी करायचे आहे, हे तुम्ही आधीच ठरवा. सेल सुरू होण्याच्या काही मिनिटा आधी जर तुम्ही या दोन्हीपैकी काय निवड करू अशा मनस्थितीत असाल तर तुमच्या हातून काही प्रोडक्ट निसटण्याची शक्यता आहे.
​कार्ड डिटेल्स करा सेव्ह ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया वर ६ ऑगस्टपासून म्हणजेच गुरुवार पासून अॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरू होत आहे. या सेल दरम्यान तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करण्यास खूपच कमी वेळ मिळतो. त्यामुळे तुम्ही आपले क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची डिटेल्स आधीच सेव्ह करून ठेवल्यास तुम्हाला सामान खरेदी करणे सोपे जाईल. या सेलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या सेलमध्ये HDFC बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांना या सेलमध्ये १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे वरील सर्व टिप्सचा आधार घेतल्यास तुम्हाला या सेलमध्ये तुम्हाला हव्या त्या वस्तू स्वस्त किंमतीत खरेदी करता येतील.