✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नवी दिल्ली(दि.4ऑगस्ट):-यंदाच्या रक्षाबंधनला भारतीयांनी चीनला जबर झटका दिला आहे. रक्षाबंधनाला होणारा ४ हजार कोटींचा राखीच्या व्यापार भारतीयांनी तोडला आहे. यामुळे भारतीय चिनी मालावर बहिष्कार घालू शकत नाही, हा चीनचा दावा निकाली निघाला आहे. आता चिनी वस्तूंवरील बहिष्कार मोहीम आता देशभरात अधिक वेगाने जोमाने राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम गेल्या १० जूनपासून अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) सुरू केली आहे. यंदा राखीचा सण ‘हिंदुस्थानी राखी’च्या स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठे यश आले आहे.
यंदा चीनमधून राखी किंवा राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य चीनमधून अजिबात आयात करण्यात आलेले नाही. या मोहिमेचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय वस्तूंद्वारे सुमारे १ कोटी राख्या या घरातून काम करणारे आणि अंगणवाडीत काम करणा-या महिलांसह इतर कष्टकरी हातांनी बनवल्या. वेगवेगळ्या आणि अतिशय आकर्षक राख्या त्यांनी बनवल्या आहेत. त्याचवेळी भारतीय राखी उत्पादकांनी भारतीय वस्तूंमधूनही राखी बनविली आणि देशभरात या राख्यांना चांगलीच मागणी मिळाली.

देशात दरवर्षी सुमारे ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो. ज्याची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधून राखी किंवा राखीसाठी लागणारे साहित्य आयत होते. हा राखीचा माल सुमारे ४ हजार कोटींचा होता. हा माल यंदा भारतात आयात झालेला नाही, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.

कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गेलेच नाहीत. तर काहींनी ऑनलाइन राख्या खरेदी केल्या आहेत. मौली किंवा कलावापासून घरच्या घरी तयार केलेली राखी आपल्या भावाच्या हातावर बांधावी. ही राखी वैदिक बनेल. त्याला रक्षा सूत्र असेही म्हणतात. ही राखी सर्वात शुद्ध आणि पवित्र आहे. पूर्वीच्या काळी अशाच प्रकारे राखी तयार केली जात होती, असे कॅटने म्हटले आहे.

चीन भारत छोडोचा शंखनाद येत्या ९ ऑगस्टपासून देशभरातील व्यापारी ‘चीन भारत छोडो’ ही मोहीम सुरू करतील आणि या दिवशी देशभर ८०० हून अधिक ठिकाणी व्यापारी संघटना शहरातील प्रमुख ठिकाणी जमतील आणि चीनला भारत सोडण्यासाठी सांगतील, असं चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याच्या पुढील कार्यक्रमाबाबत भारतीया आणि खंडेलवाल म्हणाले.
दुसरीकडे, ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ५ ऑगस्टला श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी होणा-या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्टला देशभरातील व्यापारी आपली घरे आणि बाजारपेठेत सुंदरकांडच्या पाठाचे आयोजन करतील. तसेच दुकाने आणि घरांमध्ये दिवे लावतील आणि शंखनाद, घंटानाद करतील.

आध्यात्मिक, खान्देश, धार्मिक , नवी दिल्ली, पर्यावरण, बाजार, मागणी, मिला जुला , राष्ट्रीय, रोजगार, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED