🔹आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पालकमंत्री ना.शिंदे यांच्याकडे विषय लावून धरले

🔸त्या दिशेने रस्त्यावरून येतांना इमारतही दाखविले निधी उपलब्ध झाले की कामाला अजून गती येणार!

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.4ऑगस्ट):-येथे महिला व बाल रुग्णालय बांधण्यात येत असून इमारतीचे बांधकाम निधी अभावी कासवगतीने सुरू आहे. त्यासाठी तात्काळ 9 कोटी रुपयांची तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे रविवार 2 आगष्ट रोजी मागणी केले.
ना. एकनाथराव शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना रविवारी सिरोंचा व अहेरीतही दौरा केले. त्या दरम्यान हेलिपॅड वरून राजवाड्याच्या दिशेने रस्त्यावरून जातांना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी-आलापल्लीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला महिला व बाल रुग्णालय इमारतीचे बांधकाम धावती भेटीत दाखविले आणि मागील 6 महिन्यांपासून निधी अभावी बांधकाम संथगतीने सुरू असल्याने ताबडतोब 9 कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केले. याकरिता ना.एकनाथराव शिंदे यांनी रास्त मागणी लक्षात घेऊन मागणीच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
नव्याने निर्माण होत असलेल्या महिला व बाल रुग्णालयात पार्किंग, नातेवाईंकांसाठी प्रतीक्षालय, धर्मशाळा, बालकांसाठी स्वतंत्र इमारत, एटीएम बूथ, सुरक्षागार्ड साठी क्वार्टर, रुग्णवाहिकांसाठी गॅरेज आदी व अन्य सुविधायुक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून जवळपास 56 कोटी निधी खर्चिक करून महिला व बाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे, यासाठी तूर्तास निधीची कमतरता असून त्यामुळे काम कासवगतीने सुरू आहे. याकरिता आमदार धर्मराव बाबा आत्राम मागील अनेक महिन्यांपासून शासनाकडे विषय लावून धरले असून रविवारी राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडेही आधी गडचिरोलीत आढावा बैठकीत व रविवारी प्रत्यक्षात अहेरीत 9 कोटींची निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केले.
निधी उपलब्ध झाले की, रखडलेल्या कामाला गती येणार असून रुग्णांची संख्या लक्षात घेता अहेरी उपविभागासाठी महिला व बाल रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा आणि धडपड करीत आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल

©️ALL RIGHT RESERVED