संजय मोहिते, सागर बगाडे यांना राष्ट्रीय कलांजली जीवन गौरव पुरस्कार जाहीर

64

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या वतीने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा राष्ट्रीय कलांजली जीवन गौरव पुरस्कार सिनेअभिनेते संजय मोहिते आणि सुप्रसिद्ध नृत्य व संगीतकार सागर बगाडे यांना जाहीर झाला असून रविवार दि. 7 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 1:00 वा.
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वसंत भागवत, ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. स्मिता गिरी, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने, संवाद प्रकाशन प्रकाशिका प्रा. डॉ. शोभा चाळके, आयोजक पुजा जाधव, नामदेव मोरे
अश्वजित तरटे, सई कांबळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
यावेळी डॉ. रणजित मिणचेकर, लता पुजारी, मोहन पवार, प्रा. राजकुमार कदम, पल्लवी माने-शिंदे, लक्ष्मण माळी, वर्षा अहिरराव, लीना पांडे, स्वाती कुलकर्णी, चंदाताई बेलेकर, काळुराम लांडगे, प्रभावती गायकवाड आदी मान्यवरांचा राष्ट्रीय कलांजल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.