महात्मा फुले हायस्कूलच्या ग्रंथालयाला १४ एप्रिल ला १४ ग्रंथ भेट !… पुस्तकप्रेमी डॉ.बी आर आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक पुस्तक चळवळ यांच्याकडून अनोखी भेट !…

  70

   

  धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

  धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांच्याकडून १४ एप्रिल निमित्त १४ अनमोल महापुरुष व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले.
  याप्रसंगी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन, ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, एच डी माळी, व्ही टी माळी, पी डी पाटील, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, सेवक अशोक पाटील, जीवन भोई व सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
  पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . पुस्तकांसाठी ‘राजगृह ‘ घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आहेत असे प्रतिपादन महाजन यांनी केले. ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी सत्यशोधक पुस्तक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष पी डी पाटील यांचे आभार मानले.