चिमुर येथिल इंदिरानगर झोन चौकीत पोलीस व नप चे कर्मचारी अनुपस्थित

15

🔸नगर परिषदेचे दुर्लक्ष .. सभापती अब्दुल कदिर शेख यांचा आरोप

✒️चिमूर(पुरोगामी संदेश ननेटवर्क)

चिमूर(दि.4ऑगस्ट):- नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग 5 मधील इंदिरानगर मध्ये एक कोरोना महिला रुग्ण आढळले असताना इंदिरानगर मधील रेड झोन चौकीत नगर परिषद व पोलीस प्रशासन चे कर्मचारी राहत नसल्याने त्या कडे नप दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केले आहे.

चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग 5 मधील इंदिरानगर मधील अंगणवाडी क्रमांक 8 च्या मागील भाग गल्लीतील प्रभाग पाच व सहा च्या एक महिला प्रवास करून आल्याने ती महिला कोरोना पाझिटिव्ह आढळली त्या मुळे या वस्तीत दहशत निर्माण झाली असून ज्या गल्लीत महिला कोरोना आढळली त्या गल्लीला रेड झोन म्हणून सील करून चौकी तयार करण्यात आली त्या परिसरातील नागरिक बाहेर जाऊ नये किंवा कोणीही येऊ नये यासाठी पोलीस किंवा नप कर्मचारी असणे आवश्यक असताना मात्र त्या रेड झोन चौकीत कोणीच प्रशासकीय कर्मचारी आढळत नाही याकडे नप मुख्याधिकारी खेवले यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केला असून जिल्हा प्रशासन कडून चौकशी करण्याची मागणी सुद्धा सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे.