बाभुळगाव येथे बिबट्याच्या हल्यात गाय ठार…

137

 

प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे बिबट्याच्या हल्यात गाय ठार झाल्याची घटना काल सकाळी घडली. बाभुळगाव येथील शेतकरी श्री. धनराज मुरलीधर पाटील यांच्या शेतात नेहमी प्रमाणे जनावरे ही बांधलेली असताना शिकारीच्या शोधत असलेल्या बिबट्याने जनावरांवर हल्ला चढवत एका गायीला ठार केले असून शेतात गाय मृत अवस्थेत आढळून आली. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी पोहचले व मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. गाय मालकाला त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या प्रसंगी शेतकऱ्यांनी केली. या प्रसंगी वनविभागाचे राजकुमार ठाकरे, पशू वैदकीय डॉ. नितीन जगताप, गावातील शेतकरी प्रकाश पाटील, धनराज पाटील, भूषण पाटील, राहुल पाटील, वैभव पाटील, पवन पाटील आदी उपस्थित होते. याच्या आधी पण 4, ते 5 जनावरांच्या बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना ह्या घडल्या आहेत. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी केली आहे.