कुंटूर येथील दिव्यांग बांधवांना तहसिल कार्यालय नायगाव(खै.) च्या वतीने २२ राशन किटचे वाटप

12

✒️माधव शिंदे (नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.4ऑगस्ट):-संपुर्ण जगामध्ये कोरोना कोव्हीड (१९) धुमाकुळ घालत असतांना. दिव्यांग बांधवाचे होणारे हाल व परीस्थीती लक्षात घेऊन मा.तहसीलदार सुरेखा नांदे मँडम यांनी कुंटूर येथील दिव्यांगासाठी तात्काल २२ राशन किट उपलब्ध करून दिले.कुंटूर सज्जाचे तलाठी श्री. परोडवाड साहेब, मंडळ अधिकारी साहेब, दै. लोकमत चे पत्रकार अनिल कांबळे साहेब,व शिवाजी रेनेवाड यांच्या हस्ते या राषन किट चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे चांदू आंबटवाड, मल्हारी महादाळे, माधव देवघरे, देऊबाई देवदे, जावेद चाऊस, रहीमाबी शेख व ईतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.