आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुटे यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

    43

    ✒️आलापल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    आलापल्ली(दि.4ऑगस्ट):-जिल्हा गडचिरोली, दिनांक ०१/०८/२०२० रोजी ना. एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते, सुभाष भाऊ घुटे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश, सुभाष गुटे या पूर्वी विजेपी पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करीत होते.

    यावेळी त्यांनी बोजेपी ला राम राम करून जय महाराष्ट्र नाऱ्यासोबत शिवसेनेच्या हाथ धरले या प्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात बिजेपि ला जबरदस्त धक्का बसला, अनुभवी, संघटन कौशल्य, दमदार, आणि आक्रमक भूमिका बजावणारे, समाजकारणात, राजकारणात मुर्रबी असे तडफदार सुभाष भाऊ यांच्या शिवसेनेत प्रवेश नक्कीच शिवसेना फायदा होणार असे अहेरी विधानसभा क्षेत्रात चर्चा जोमाने सुरू आहे.

    या प्रसंगी जिल्हा प्रमुख गडचिरोली, राजगोपाल सुलवावार , उपजिल्हा प्रमुख, रियाज भाई, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख, अरुण भाऊ दुर्वे सर, उप जिल्हा प्रमुख प्रभारी, धर्मराज रॉय, तालुका प्रमुख अहेरी, अक्षय करपे, तालुका प्रमुख एटापल्ली किसन मात्तमी, तालुका प्रमुख मुल च्येरा , उप तालुका प्रमुख, दिलीप सूर्प. म, शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.