संपादक व पत्रकार सेवा संघाच्या संपर्कपदी भगीरथ बद्दर यांची निवड

15

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.4ऑगस्ट):- संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ह्या सामाजिक व राजकीय संपर्क प्रमुखपदी परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य अध्यक्ष किसन भाऊ असे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे. परळी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख (सामाजिक व राजकीय) पदी निवड झाली आहे पत्रकारिता सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील बदर यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेच्या संघटनात्मक कार्यासाठी सदरची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल राज्य कार्यवाह मनोज साकी, सचिव अरविंद गाडेकर यांनी अभिनंदन केले आहे.