श्रीगोंदा शहरात 3 दिवसांचा लॉकड़ाऊन, नागरिकांना घरातचं राहण्याचे आवाहन

28

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.4ऑगस्ट):-श्रीगोंदा शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ५० झाली आहे, यामुळे श्रीगोंदा शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो थांबविण्याची गरज आहे. यासाठी श्रीगोंदा व्यापारी असोसिएशन सदस्य, जेष्ठ नागरिक व श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सर्वांनी प्रशासनास शहर बंद बाबत विनंती केली आहे त्यानुसार या निर्णयास श्रीगोंदा तालुका प्रशासनाने संमती दर्शविली आहे.
दिनांक 4/8/20 ते दि 6/8/20 दरम्यान श्रीगोंदा शहरात मेडीकल, दवाखाने, दुध, पाणी वाटप वगळता पुर्णपणे बंद राहील. तसेच शासकीय कार्यालये बंद राहतील.