✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4ऑगस्ट):- उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापुर) येथे आज दि.४ ऑगस्ट ला तीन कोरोना रुग्ण आढळले .या तीन रुग्नापैकी दोन रुग्ण तळोधी (बाळापुर) येथील बस स्टँड च्या परिसरातील आहेत, तर एक रुग्ण जवळच असलेला नवा नगर येथील आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने आपली पाऊले उचलली आहेत.
यापूर्वी सुध्दा तळोधी (बाळापुर) येथे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या परिस्थितीला भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी जनतेने घाबरून जाऊ नये असे आव्हाहन प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे काल दि.( ३ ऑगस्ट) ला चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १७ रुग्ण निघाले होते त्यात नागभिड तालुक्यातील सर्वाधिक १२ कोरोना रुग्ण होते.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED