जिल्हयात आत्तापर्यंत एकूण ५०० जणांची कोरोनावर यशस्वी मात

  38

  #GadchiroliCoronaUpdate

  🔺आज २ कोरोनामुक्त तर नवीन १३ बाधित

  ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  गडचिरोली(दि.4ऑगस्ट):-जिल्हयात आज नवीन १३ कोरोनाबाधित आढळून आले तर २ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी १४३ वर गेली. तसेच एकूण कोरोनामुक्त रूग्णांचा आकडा ५०० वर गेला. आत्तापर्यंत जिल्हयात ६४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  नवीन दोन कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये चामोर्शी व एटापल्ली येथील प्रत्येकी एक-एक रूग्णाचा समावेश आहे. तर नवीन १३ बाधितांमध्ये आरमोरी येथील ३ एसआरपीएफ, गडचिरोली येथील १ सीआरपीएफ व १ एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील १ पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील १ नर्स, १ रूग्ण, पूर्वी कोरोना बाधित आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील व विलगीकरणत ठेवलेल्या ४ जणांचे व मेडिकल कॉलनीतील एकाचा कोरोना अहवाल बाधित आढळून आला आहे.