बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर अभियंता तरुणाने केली आत्महत्या

21

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.5ऑगस्ट):-बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एन दोन ठाकरेनगर भागात हा प्रकार घडला. रुपेश दगेंद्र बिऱ्हाडे (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुपेश हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. सोमवारी सायंकाळी त्याच्या नात्यातील बहिणी त्याला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. राखी बांधल्यानंतर रात्री सव्वानऊच्या सुमासार तो खोलीमध्ये गेला. त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता त्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रुपेशची आई शिक्षिका असून, वडील निवृत्त प्राध्यापक आहेत. रुपेशला जुळा भाऊ आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार गोकुळ जाधव तपास करीत आहेत. चार दिवसांपासून रुपेश कोणाशीही बोलत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.