कपटी मित्रापेक्षा, दिलदार शत्रू बरा :-: सांगली लोकसभा कवित्व

  214

  *सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

   

  म्हसवड : सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख उमेदवार भाजपचे संजयकाका व अपक्ष उमेदवार विशाल दादा यांनी पत्रकार परिषद घेऊन मीच कसा विजयी होणार,यांची मांडणी केली.त्यामध्ये दोघांनीही आपापले छुपे पत्ते व अंतर्गत रणनिती उघड करून त्यांचे मित्र व शत्रू उघड केले.
  सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत सुरूवातीपासून खूप ट्वीस्ट निर्माण झालेला आहे.उमेदवार निवडीपासूनच महायुती व महाआघाडीत मोठी रस्सीखेच व प्रचंड स्पर्धा सुरू होती.भाजपमध्ये संजयकाकांना खूप विरोध असला तरीही खासदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे कडेगांवचे आ.पृथ्वीराज देशमुख,जतचे विलासराव जगताप,खानापूर व आटपाडीमधील बाबर गट,कवठेमहांकाळचे अजित घोरपडे व मिरजेचे काही भाजप नगरसेवकांनी संजयकाकांच्या विरोधात काम केले,हे सर्व झाले त्यांचे कपटी मित्र तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांनी महाआघाडीचे काम न करता डायरेक्ट भाजपला मदत केल्याने ते झाले दिलदार शत्रू,
  तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना कॉग्रेस व राष्ट्रवादीने पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मोठी रसद पुरवत मदत केली हे झाले दिलदार शत्रू.
  अशी ही कपटी मित्र व दिलदार शत्रू यांचे विश्लेषण करता येईल.
  यामध्ये संजयकाका यांच्यासाठी कपटी मित्रांची यादी खूप मोठी आहे तर विशाल पाटील यांच्यासाठी दिलदार शत्रूंच्या यादीत खूप अदृश्य हात आहेत.एकूणच काय दोन्ही उमेदवारांनी आपापले शत्रू व मित्र उघड केल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात जी गुजबुज, दबक्या आवाजात चर्चा व दावे केले जात होते, तेच आता पत्रकार परिषदेमुळे चव्हाट्यावर आले आहे.तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांना एका पत्रकाराने सांगलीचा निकाल काय लागेल या विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माझे या मतदारसंघात लक्ष नव्हते परंतु भाजपचा पराभव होईल हे नक्की असे सांगितले.तर दुसरीकडे कॉग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी सांगितले की सांगली लोकसभेत मी कोणत्या पाटलांचा प्रचार केला व पाठिंबा दिला हे निकालानंतर समजून येईल.असे विधान करून धमाका उडवून दिला.विशेष म्हणजे जयंतराव पाटील व विश्वजीत कदम या दोघांच्या विधानावरून असे स्पष्ट दिसून येते की सांगली लोकसभा निवडणुकीत काहीतरी वेगळे घडणार आहे हे मात्र नक्की.आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पत्रकार परिषद घेऊन काय काय आरोप करतात? व त्यांचे कपटी मित्र कोण कोण आहेत?हे पाहणे औत्सुक्याचे आहे!!!!
  ही उत्सुकता दूर करण्यासाठी आपणास ४ जुनची प्रतिक्षा करावी लागणार आहे.