राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचा उत्कृष्ठ निकाल

    584

    चिमुर / प्रतिनिधी-

    गांधी सेवा शिक्षण समिती व्दारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमुरने नुकत्याच जाहीर झालेल्या HSC फेब्रुवारी /मार्च 2024 च्या परिक्षेत घवघवीत यश संपादीत केले. यात कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 87.43 टक्के लागलेला आहे. त्यात वाणिज्य शाखेचा निकाल 92.43 टक्के तर कला शाखेचा 78.12 टक्के लागलेला आहे.

    वाणिज्य शाखेतून कु. सुप्रिया संजय राजूरकर हिने 86.67 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम स्थान पटकाविले. कु. मयुरी प्रेमलाल सहारे हिने 82.67 टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय स्थान पटकाविले. आदित्य भीमराव पाटील यांनी 81.83 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय स्थान पटकाविले. कला शाखेतून लोकेश राजेंद्र कुंभारे याने 69.00 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम स्थान पटकाविले. कु श्वेता श्रीकृष्ण दडमल हिने 66.83. टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय स्थान पटकाविले. तर सुमित बापूराव वाकुळकर याने 64.50 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय स्थान पटकाविले.

    कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतून 5 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 79 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 46 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायकराव कापसे तसेच संस्थेचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.अश्विन चंदेल, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, प्रा. रोशन कुमरे, प्रा. गुणवंत वाघमारे, प्रा. दुर्योधन रोकडे, प्रा. किशोर चटपकार, प्रा. अमोल मालके, प्रा. अमर ठवरे, प्रा. रिना गाडगे, प्रा. संतोषी दिघोरे, प्रा. निता गोहणे, प्रा. डॉ. कावेरी जवंजाळ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.