सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चे SSC परीक्षेत घवघवीत यश

    339

    रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
    ब्रम्हपुरी:- नुकताच SSC परीक्षेचा निकाल घोषित झाला.यामध्ये आमच्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी,ब्रम्हपुरी द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चां उत्कृष्ठ निकाल लागला. शाळेचा एकूण 96% निकाल लागला असून कू. तन्वी धनराज बनकर हिने 85.40% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर 77.60% गुण मिळवीत राहुल कमलशिल मेश्राम द्वितीय व 76% गुण प्राप्त करत कु. सानिया सूरज लांडगे हिने तृतीय स्थान पटकाविले. तसेच शाळेतील प्रविष्ट ऐकून विद्यार्थ्यांमधून 03 प्रावीण्य, 20 प्रथम आणि 21 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.निकाल घोषित झाल्या बरोबर संस्थेचे अध्यक्ष आद. डॉ. प्रेमलाल मेश्राम, आद. विवेक प्रे. मेश्राम सचिव, माजी प्राचार्य आद. वाय.आर.मेश्राम कोषाध्यक्ष, प्रा. लिनाताई मेश्राम सदस्या, श्री बी. एम. नगराळे मुख्याध्यापक यांनी प्रविण्याप्रप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.