ज्ञानेश्वर शेजुळ यांच्या हस्ते सेवली येथे सिमेंट रस्त्याचे भुमीपुजन संपन्न

    50

    ?अयोध्या येथील राममंदिर भूमीपूजन चे औचित्य साधत सोशियल डिसट्न्स् पाळत पार पडले उदघाटन

    ✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

    जालना(दि.5ऑगस्ट):-भारतीय जनता पार्टी चे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.बबनराव लोणीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून निधी खेचून आणत व भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा.राहुलभैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोध्येतील राममंदिर भुमिपुजनाचे औचित्य साधत आज (दि.5ऑगस्ट) इतिहासात नोंद झालेल्या दिवशी आज सेवली येथे भा.ज.पा.चे मा.तालुकाअध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांचे हस्ते 5 लाख रुपये किंमतीच्या सिमेंट रस्ता कामाचे भुमिपुजन करण्यात आले.या उदघाटना दरम्यान कोरोनाच्या बाबतीत सोशल डिस्टंसिंग व शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले.यावेळी सेवली सेवलीचे सरपंच आसाराम सदावर्ते, मा.सरपंच कोमलशेठ कुचेरिया, ग्रा.प.सदस्य व चेअरमन दिलीपराव जोशी, ग्रा.पं.सदस्य शिवराज तळेकर ,ग्रा.प.सदस्य नविदभाई, संजय काळे,एजाजखान, रामदास झोरे, कैलास ऊबाळे,अमोल मोरे,राजु जायभाये, सुनिल भाउजी व ईर्शादखान यांच्यासह गावातील अनेकांची उपस्थिती होती या सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे सेवली गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.