कोविड रुग्णालयात भीषण आग, ८ रुग्णांचा भाजून मृत्यू

27

✒️अहमदाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदाबाद(दि.6ऑगस्ट):-गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एका रुग्णालयात आग लागून ८ रुग्णाची दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ही आग लागल्याने इतर ३५ रुग्णांना दुसऱ्या सुरक्षित वॉर्डात हलवण्यात आले आहे. आगीत भाजून मृत्यू पावलेले सर्व रुग्ण हे करोनाची लागण झालेले रुग्ण होते. या आगीबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘आय अॅम गुजरात’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आयसीयूमध्ये लागली. त्यानंतर ती इतरस्त्र पसरली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच घबराट पसरले. रुग्णालयातील सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या दुर्घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आयसीयूत लागलेली ही आग नंतर पसरत गेली. ही आग अहमदाबादमधील शेरी रुग्णालयातच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. विशेष म्हणजे या रुग्णालयात करोना झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आगीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरंगपुरा येथे हे करोनाला समर्पित केलेले शेरी रुग्णालय आहे. आज पहाटे साडे तिनच्या सुमाराला ही आग लागली.
या आगीबाबत वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत एकूण ८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना करोनाची लागण झालेली होती. या आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ५० हून अधिक रुग्णांची सुखरूप सुटका केली. तर या रुग्णालयातील एकूण ३५ रुग्णांना रुग्णालयाच्या दुसऱ्या सुरक्षित वॉर्डात हलवण्यात आले आहे.

नातेवाईकांनी रुग्णालयाकडे घेतली धाव रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच करोना रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर घाबरलेल्या अवस्थेत उभा असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, माझ्या ओळखीची एक व्यक्ती या रुग्णालयात उपचार घेत आहे. या रुग्णालयाला आग लागल्याचे समजताच मी इकडे धाव घेतली.